शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (16:29 IST)

दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर मुंबईच्या हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळले

मुंबई- दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर मुंबईच्या हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मोहन डेलकर यांचा मृतदेह मरीन ड्राइव्हच्या एका हॉलेलमध्ये मिळाला. 
 
मुंबई पोलिसांचा घटनास्थळी तपास सुरू आहे. प्रथम दृष्ट्या पोलिसांनी आत्महत्येची शक्यता व्यक्त केली आहे. खासदार डेलकर यांच्याजवळ गुजराती भाषेत लिहिलेली एक चिठ्ठी आढळल्याचं समजतं.
 
डेलकर हे लोकसभेतील दादरा आणि नगर हवेली मतदार संघातून अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते.  58 वर्षांचे डेलकर यांच्या पश्चात पत्नी कलाबेन डेलकर आणि दोन मुले अभिनव व दिविता असा परिवार आहे.
 
1989 पासून ते या लोकसभा मतदार संघातून निवडून येत आहेत. 1989 मध्ये पहिल्यांदा ते निवडून आले आणि खासदार झाले. 1986-89 पासून ते दादरा आणि नगर हवेली येथील युवा कॉंग्रेसचे सरचिटणीस होते. त्यांचा असा संशयास्पद रीत्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.