गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (13:11 IST)

नवी मुंबईतील तलावा जवळ तरुणीचा मृतदेह आढळला, खुनाचा गुन्हा दाखल

death
नवी मुंबईतील बेलापूर जवळ एका तलावात बुधवारी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास एका 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. काही मासेमारांना मृतदेह आढळला.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. ही तरुणी नेरूळच्या एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिचे एका मुलावर प्रेम होते. प्रियकराने तरुणीचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. खून केल्यांनतर स्वतः प्रियकराने देखील आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील सिडवूड सेक्टर 48 इथं राहणारी तरुणीचे एका तरुणाशी प्रेम संबंध होते. प्रियकरानं तरुणीचा गळा आवळून खून करून स्वतः तलावात उडी घेत आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस तरुणाचा मृतदेह शोधत आहे. 

पोलिसांनी उद्यानाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर त्यांना मयत तरुणी आणि तिचा प्रियकर हे दोघे संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास दुचाकीवरून तलावाच्या दिशेला जातांना दिसले. मात्र तरुण परत येताना दिसला नाही. तरुणीचा खून केल्यांनतर तरुणाने तलावात उडी घेत स्वतःला संपविण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
बुधवारी संध्याकाळी काही भाविकांना तरुणीचा मृतदेह आढळला त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला.तरुणीचा खून गळा आवळून केल्याचे स्पष्ट झाले असे दिसले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच समजू शकेल. अशी माहिती एनआयआर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास लावत आहे. 
Edited by - Priya Dixit