शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 10 डिसेंबर 2024 (11:51 IST)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुर्ला बस अपघातावर शोक व्यक्त करीत मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत केली जाहीर

Devendra Fadnavis
Mumbai News: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुर्ला दुर्घटनेतील मृतांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून जखमींच्या उपचाराचा खर्च बेस्ट आणि बीएमसी उचलणार आहे. मुंबईतील कुर्ला येथे सोमवारी झालेल्या बस अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 49 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुर्ला दुर्घटनेतील मृतांना 5 लाख रुपयांची मदत आणि जखमींच्या उपचाराचा खर्च बेस्ट आणि बीएमसी करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातात काही जणांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत.' जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो असे देखील ते म्हणाले.
 
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेतील जखमींच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टला उचलण्याचे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

Edited By- Dhanashri Naik