सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 18 मार्च 2024 (20:46 IST)

मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली?

iqbal chahal
लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने एक मोठी कारवाई केलीय. भारतीय निवडणूक आयोगाने BMC आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह अनेक अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांच्या बदलीचे आदेश दिलेत.
 
सहा राज्यातील गृह सचिवांच्या बदलीचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत. या राज्यांमध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, आणि उत्तराखंड या राज्याचा समावेश आहे. यासह पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक यांनाही हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत.
 
अनेक अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) देशभरातील अनेक अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्याचे आदेश जारी केले आहेत.  गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांतील गृहसचिवांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासह मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांच्याही बदल्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना (डीजीपी) काढून टाकण्याची देखील कारवाई केली आहे.
 
Edited by Ratnadeep Ranshoor