1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 12 मार्च 2025 (18:16 IST)

मुंबईत रस्त्याच्या कडेला वृद्धाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला

मुंबईतील प्रतीक्षा नगर बस डेपो जवळ एका वृद्धाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढल्याने खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या कडेला मृतदेह दिसल्यावर लोकांनी पोलिसांना सदर माहिती दिली. मृतदेह कुजलेले असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली होती. 
पोलिसांना माहिती मिळाल्यावर पोलिसांनी मृताची ओळख पटवली असून मयत व्यक्तीचे नाव अनंत रामचंद्र अकुबथिन असे आहे मयतचे वय 69 वर्ष असून ते प्रतीक्षानगर भागातील रहिवासी असून ते आपल्या भावसोबत राहायचे. त्यांचे कुटुंब विक्रोळीला वास्तव्यास आहे. मयत अनंत यांना दारूचे व्यसन होते. 
मंगळवारी सकाळी 11:30 वाजता एका वाटसरूने रस्त्याच्या कडेला मृतदेह बघितल्यावर लगेच वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्यात कळविले.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर वृद्धाचा मृत्यू नैसर्गिक होता की त्यांची हत्या झाली हे समजेल. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.