बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑगस्ट 2024 (12:51 IST)

Badlapur Case: बदलापूर प्रकरणात शाळा व्यवस्थापनाविरुद्ध एफआयआर नोंदवली

बदलापुरात अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणात आरोपीला अटक एली आहे. तसेच शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. 
 
एफआयआरमध्ये असे नमूद केले आहे की जेव्हा जेव्हा कोणत्याही अधिकाऱ्याला अल्पवयीन मुलांविरुद्ध अशा प्रकारच्या लैंगिक छळाची माहिती मिळते तेव्हा पुढील कारवाईसाठी पोलिस अधिकाऱ्यांना माहिती देणे बंधनकारक असते. याप्रकरणी पीडित मुली आणि त्यांच्या पालकांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.

मुलीने शाळेतून घरी आल्यावर तिच्या प्रायव्हेटपार्ट मध्ये वेदना होत असल्याची तक्रार पालकांना केली. त्यांनी मुलीला विचारपूस केली असता त्यांना या प्रकरणाची माहिती मिळाली.घाबरलेल्या पालकांनी मुलीच्या वर्गातील एका इतर मुलींच्या पालकांना विचारणा केली असता त्यांनी देखील आपली मुलगी शाळेत जाण्यास नकार देत असून काही दिवसांपासून घाबरत आहे. दोन्ही मुलींची प्रकृती संशयास्पद आढळल्याने पालकांनी वैद्यकीय चाचणी केली त्यात मुलींशी लैंगिक छळ झाल्याचे समोर आले. 

नंतर मुलींचे पालक पोलिसांत तक्रार नोंदवण्यासाठी गेले असता त्यांना पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी त्यांना बसवून ठेवले. जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांनी या प्रकरणात दखल घेतल्यावर पोलिसांनी 17 ऑगस्ट रोजी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली.  

मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली होती. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले, आता चार वर्षाच्या चिमुकल्यादेखील सुरक्षित नाही. त्यांच्यावर देखील अत्याचार केला जातो.शाळाच सुरक्षित नसतील तर शिक्षणाचा आणि इतर गोष्टींचा काय अर्थ आहे. 

उच्च न्यायालयाने या प्रकरणाची माहिती लपवण्याबद्दल शाळा प्रशासनाविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्यास सांगितले. कोर्टाने सरकारकडून केस डायरी आणि एफआयआरची प्रत मागवली होती. या प्रकरणाची सुनावणी 27 ऑगस्ट रोजी होणार आहे. 
Edited by - Priya Dixit