मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 2 डिसेंबर 2020 (08:58 IST)

पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ बंगल्यावर कुटुंबासह मुक्काम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर कुटुंबासह मुक्काम केला. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीचा मुहूर्त साधत त्यांनी वर्षावर तीन दिवस मुक्काम केला. त्यांनी शनिवार ते मंगळवार दरम्यान ‘वर्षा’ बंगल्यावर मुक्काम केला.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी वास्तव्यास आहेत. गेल्या वर्षभरापासून ते मातोश्री बंगल्यातूनच सर्व कार्यभार सांभाळत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याचं नूतनीकरण केलं. या वास्तूरचनेत काही बदल केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबासह वर्षावर वास्तव्य केलं.