बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (12:54 IST)

घाटकोपर :कॅब कार चालकाला ऑडी कार चालकाने मारहाणी केली, प्रकृती चिंताजनक

महागड्या कारला धडक दिली म्हणून ऑडीकारच्या चालकाला राग आला आणि त्याने कॅब चालकाला जबर मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली असून त्या आधारे घाटकोपरच्या एका जोडप्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या ऑडी कार चालकाने कॅब  चालकाला मारहाण केली आणि त्याला जमिनीवर उचलून फेकताना दिसले. यामुळे कॅब चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. 

सदर घटना असल्फा मेट्रो स्टेशनजवळ घडली ऑडी कार चालताना थांबली. त्या मागून येणारी कॅब कारला धडकली. ऑडी कार चालक कारचे किती नुकसान झाले हे पाहायला खाली उतरतो आणि कॅब चालक देखील बाहेर येतो. तेवढ्यात ऑडी कार चालक कॅब चालकाला अपशब्द बोलू लागतो. तो कॅब चालकाला मारहाण करतो. आणि रागाच्या भरात येऊन उचलून जमिनीवर आपटतो.

या मारहाणीमुळे पीडित कॅब चालकाच्या डोक्याला जबर मार लागला आणि तो बेशुद्ध झाला. तिथे असलेले सुरक्षा रक्षकांनी त्याला  रुग्णालयात नेले.डोक्याला जबर मार लागल्याने त्याला जेजे रुग्णालयात रेफर केले.त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे  या प्रकरणी आरोपी ऑडी चालकाच्या विरोधात मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर होण्यासाठी नोटीस बजावली आहे. अद्याप त्याला अटक केली नाही. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
Edited by - Priya Dixit