गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 7 सप्टेंबर 2023 (19:41 IST)

नवी मुंबईत सोन्याची दहीहंडी, 'ही' आहे खासियत?

dahi handi
लहान मुले आणि तरुणांच्या आवडीचा सण एका दिवसावर येऊन ठेपला आहे. दहीहंडी हा सण मुंबई आणि नजीकच्या भागात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षी गोविंदा पथक मोठ्या उत्साहाने सण साजरा करत हंडी फोडून लाखो रुपयांचं मानधनाचे मानकरी होतात.  मुंबई जवळील सानपाडा येथे सोन्याच्या दहीहंडीचं आयोजन केलं आहे. या दहीहंडीची जोदार चर्चा सुरू झाली आहे.
 
मुंबई जवळील नवी मुंबईतील सानपाडा विभागातील समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या साई भक्त सेवा मंडळाने भव्य सोन्याच्या दहीहंडीचं आयोजन केलं आहे.
 
नवी मुंबईतील सोन्याची साईहंडी फोडण्यासाठी नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड आणि पुण्यातून गोविंदा पथक येतात. ही हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकामध्ये मोठ्या प्रमाणात चढाओढ पाहायला मिळते.
 
नवी मुंबईतील ही सोन्याची दहीहंडी फोडण्यासाठी महिला गोविंदा पथकांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. नवी मुंबईतील या साईहंडी आणि व्यासपीठाची विधिवत पूजा संपन्न झाली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दरम्यान, उद्या या सोन्याच्या साईहंडीचा थरार पाहण्यासाठी नवी मुंबईकरांना मोठी गर्दी करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग आमले यांनी केलं आहे.
 
नवी मुंबई शहरात दहीहंडी उत्सवाची परंपरा आहे. दहीहंडी उत्सवाच्या अगोदर चोरहंडी उत्सवही साजरा केला जातो. या चोरहंडी उत्सवाचे आयोजन जुईनगर विभागात करण्यात आले होते. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. ऐरोली विभागात शिवसनेच्या शिंदे गटाचे विजय चौगुले यांच्यावतीने सुनील चौगुले स्पोर्टस असोसिएशनच्या माध्यामातून अकरा लाखांचे विविध पारितोषिक देण्यात येणार असून ऐरोली मधील सर्वात मोठी दहीहंडी आहे. ऐरोली सेक्टर १५ येथी गणेश इच्छापुर्ती मंदिराजवळ दहीहंडी उभारण्यात आली आहे. या कार्यक्रमात वाद्यवृदांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात अलेला आहे. सानपाडा विभागात भाजपचे पांडुरंग आमले व साई भक्त सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने  सानपाडा सेक्टर ८ येथील हुतात्मा बाबू गेणू मैदान येथे सोन्याच्या हंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी या दहंडीमध्ये सहा ताळे सोने वापरुन हंडीला सोन्यांचा मुलामा देण्यात आला.  जो गोविंदा पथक हंडी फोडणार त्यांना ही हंडी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमांला विशेष उपस्थिती  आमदार मंदा म्हात्रे लावणार असल्याची माहिती पांडुरंग आमले यांनी दिली. घणसोली येथे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची शिवसेनेचे ए.के. पाटील यांच्या माध्यामातून घणसोली सेक्टर १० येथील संत निरंकारी चौकामध्ये दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वाद्यावृंदाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे. याच बरोबर शहरात विविध छोट्या मोठ्या दहीहंडीचे आयोजनही करण्यात येणार आहे.
 
५० सार्वजनिक दहीहंडी उत्सवांना परवानगी
 
नवी मुंबई शहरात ५०  सार्वजनिक दहीहंडी उत्सवांना परवानगी देण्यात आली असून शहरात कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न  निर्माण होणार नाही यासाठी चोख  पोलीस व्यवस्था सज्ज करण्यात आली आहे. विवेक पानसरे उपायुक्त परिमंडळ १
Edited by : Ratnadeep Ranshoor