सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 17 ऑगस्ट 2023 (18:01 IST)

नवी मुंबईत पहिल्यांदाच मेडिकवर हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या छातीत बसविला बुलेटच्या आकाराचा पेसमेकर

heart
एबस्टेनॉइड हार्ट नावाच्या दुर्मिळ हृदय विकाराने ग्रस्त रुग्णावर यश्स्वी उपचार
नवी मुंबई: एबस्टेनॉइड हार्ट सारख्या दुर्मिळ जन्मजात हृदयविकाराचा असलेल्या ७६ वर्षीय रुग्णावर जगातील सर्वात लहान (बुलेटच्या आकाराचे) लीडलेस पेसमेकर यशस्वीरित्या रोपण करण्यात आले.  नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटल येथे हि शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून सर्वात लहान आकाराचा पेसमेकर बसविल्याचा हा पहिलाच रुग्ण ठरला आहे. डॉ. अभय जैन (सीव्हीटीएस सर्जन ) आणि डॉ. अनुप महाजनी (इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट) यांच्यासह टिमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.
 
रुग्ण श्री. संतोष कदम (नाव बदलले आहे) यांना एबस्टेनॉइड हार्ट (एब्स्टेनची विसंगती) आढळून आले होते, ज्यात लहानपणापासूनच हृदयाची असामान्य रचना दिसून आली. दोन्ही पायांना सूज आणि व्हेरीकोज वेन्स तसेच दम लागणे अशा समस्यांनी ग्रासलेल्या या रुग्णाला गंभीर ट्रायकस्पिड रेगर्गिटेशनचे निदान झाले.  ज्यात हृदयाच्या उजव्या बाजूच्या खालच्या वेंट्रिकलमध्ये दाब येत होता. डॉ. अभय जैन यांनी त्यांच्यावर बायोप्रोस्थेटिक व्हॉल्व्ह बदलून ऑपरेशन केले.
 
डॉ अभय जैन,( कार्डिओव्हस्कुलर थोरॅसिक सर्जन,मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई)  सांगतात की, एब्स्टाईन विसंगतीची घटना ही २ लाखांपैकी एका व्यक्तीमध्ये आढळून येते. जन्मजात हृदयरोगांपैकी याचे प्रमाण ०.२% आहे. एबस्टाईनची विसंगती म्हणजे जन्माच्या वेळी हृदयासंबंधीत आढळून आलेली विकृती. ट्रायकस्पिड व्हॉल्व्ह हा हृदयाच्या उजव्या बाजूला असलेल्या दोन मुख्य झडपांपैकी एक आहे. ट्रायकस्पिड रेगर्गिटेशन म्हणजे असा विकार ज्यामध्ये या झडपा पुर्णतः  बंद होत नाही आणि त्यामुळे दम लागणे, धडधडणे, पायावर सूज येणे आणि यकृताचे नुकसान यांसारखी लक्षणे जाणवू शकतात. त्यामुळे  संपूर्ण हार्ट ब्लॉक होण्याचा धोका होता. रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना उपचारांविषयीची पूर्ण कल्पना देण्यात आली. ट्रायकस्पिड रीगर्जिटेशनशिवाय ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
 
डॉ. अनुप महाजनी ( इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट) यांनी रूग्णाचे मूल्यमापन केले आणि डॉ. अभय जैन यांनी रुग्णाच्या कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर रूग्णाला पूर्ण हार्ट ब्लॉक असताना लीडलेस पेसमेकर लावण्याबाबत माहिती दिली. भविष्यात रुग्णाला रक्त पातळ करण्याची गरज नसल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.
 
हे ड्युअल-चेंबर लीडलेस पेसमेकर- AV MICRA हे हाय एंड तंत्रज्ञान (२.६cm बुलेटच्या आकाराचे) आहे जे शरीरात चिरफाड  न करता हृदयाच्या उजव्या बाजूला बसविले जाते. हे रुग्णांमध्ये कुठल्याही प्रकारचा संसर्ग निर्माण करत नाही. नियमित पेसमेकरच्या तुलनेत ते आकाराने लहान आहे, वजन १.७५ ग्रॅम आहे, त्याचा आवाज ०.८cc आहे, लांबी २.६ सेमी इतकी आहे. पारंपारिक पेसमेकरच्या तुलनेने यात छातीवर कोणत्याही प्रकारची चिरफाड केली जात नाहीकिंवा डाग पडत नाही. ते थेट पायातील रक्तवाहिन्यांद्वारे हृदयात टाकले जाते. ही एक नॉन-सर्जिकल प्रक्रिया आहे, जेथे टाके न टाकता उजव्या फेमोरल व्हेनद्वारे उजव्या वेंट्रिकलमध्ये मायक्रो एव्ही घातली जाते. प्रक्रियेचा कालावधी केवळ १५ मिनिटे आहे आणि प्रक्रियेनंतर कोणतीही गुंतागुंत आढळून येत नाही. मेडिकवर हॉस्पिटल्स हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि रुग्णांना पुढील तपासणी, निदान किंवा उपचारांसाठी इतर शहरात जावे लागणार नाही अशी माहिती डॉ. अनुप महाजनी( इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई) यांनी दिली.
 
मला जन्मजात हृदयविकार असल्याचे निदान झाले आणि चालताना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. दैनंदिन कामे करण्यासाठी मला अडथळे येऊ लागले. माझा त्रास कमी केल्याबद्दल, मोकळा श्वास घेता येत असल्याने तसेच माझी शारीरीक क्षमता सुधारल्याबद्दल मी डॉक्टरांचा आभारी आहे. मी आता माझी दैनंदिन कामे सहजतेने पूर्ण करू शकतो. मी प्रत्येकाला त्यांच्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार वैद्यकिय उपचार करण्याचा सल्ला देतो तसेच   गंभीर लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका.  उपचारात उशीर केल्याने तुमचा जीव धोक्यात येतो आणि गंभीर गुंतागुंत निर्माण होतात. तुमच्या हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी वेळीच निदान व उपचार गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया रुग्णाने व्यक्त केली.