आनंद शिंदे यांचा पुतण्या सार्थक शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा पुतण्या सार्थक दिनकर शिंदे यांचे दुःखद निधन झाले आहे. सार्थक हे नांदेड येथे असताना त्यांना हृदविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याची बातमी आहे. सार्थक शिंदे हे उत्कृष्ट तबला वादक होते.
सार्थक शिंदे यांच्या अचानक मृत्यूमुळे संगीत सृष्टीत मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे शिंदे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सार्थक शिंदे यांनी अनेक भीमगीतं गायली तसेच त्यांना ढोलकी वाजवण्याचीही आवड होती. शिंदे घराणं आपल्या भीम गीतासाठी प्रसिद्ध आहे. शिंदे घराणं गेल्या चार पिढ्यांपासून या क्षेत्रात नाव लौकिक करत आहेत.
सार्थक शिंदे यांच्या निधनाच्या बातमीमुळे सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.