दिलासादायक बातमी ! मुंबईचा समावेश पहिल्या स्तरात,लोकल ट्रेन सुरु होणार?
मुंबईकरांना एक मोठी दिलासादायक बातमी आहे .आता मुंबई कोरोनमुक्त होण्याच्या पातळी वर येत असून तिचा समावेश पहिला स्तरात झाला आहे.सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी आढळत आहे .प्रत्येक ठिकाणी तिथली पॉझिटिव्हिटी दर बघून अनलॉक करण्यात येत आहे. आता मुंबईचा देखील ताज्या आकडेवारीनुसार पहिल्या स्तरात समावेश झाला आहे.मुंबईत काही परिसरात सर्व निर्बंध काढण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरु होणार का ?असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की,जरी मुंबई पहिल्या स्तरावर आले आहे तरी अद्याप कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे निर्बंध तिसऱ्या स्तरासारखेच पाळण्यात येतील.पुढील आठवड्यात कोरोनाची काय परिस्थिती आहे ते बघूनच पुढील निर्बंध काढण्यात येतील.
ते म्हणाले,सध्या तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे आता आधीपासूनच सतर्कता बाळगण्याची अत्यंत आवश्यकता आहे.त्यामुळे अद्याप लोकल ट्रेन बद्दल काहीच विचार घेण्यात येत नाही.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटे साठी पूर्व तयारी करून अधिक सजग राहावे लागणार.या साठी मुंबईकरांचा विचार करायला पाहिजे आणि तसेच टप्प्या-टप्याने निर्बंध उघडले तर हे सगळ्यांसाठी बरं होईल. असे ही ते म्हणाले.