मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (18:07 IST)

नवजात बाळाचे हृदयाचे ठोके पुन्हा

मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार 3.5 किलो वजनाच्या पूर्ण-मुदतीच्या बाळाला आपत्कालीन परिस्थितीत मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयाच्या एनआयसीयुत दाखल करण्यात आले. जन्मावेळी बाळाच्या हृदयाचे ठोके आणि श्वसनप्रक्रिया सामान्यरित्या होत नसल्याने जन्मल्यानंतर अवघ्या 25 मिनिटांतच बाळाच्या हृदयाचे ठोके व श्वासोच्छवास सुरळीत करण्यात येथील डॉक्टरांच्या चमूला यश आले. 
 
नवजात शिशू तज्ञ डॉ. वीरेंद्र वर्मा सांगतात की, आम्ही या बाळावर हायपोथर्मियाची पद्धत अवलंबविण्याचा प्रयत्न केला तत्पूर्वी त्याचे फायदे आणि दुष्परिणाम याविषयीची माहिती बाळाच्या पालकांना सांगून या उपचाराचा निर्णय घेण्यात आला. उपचारात्मक हायपोथर्मिया उपचारामध्ये बाळाला मानवी शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा 3 ते 4 अंश सेंटीग्रेड कमी तापमानात ठेले जाते ज्यामुळे मेंदूमधील इजा कमी होण्यास मदत होते. या प्रक्रियेत 72 तासांपर्यंत उपचारात्मक हायपोथर्मिया दिला जातो. रुग्णालयात पोहोचल्यानंतर 10 मिनिटांच्या आत मुलाला काही विशेष औषध देण्यात आले. त्यानंतर बाळाच्या हृदयाचे ठोके पडायला लागले. आता बाळाची प्रकृती उत्तम असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.