1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (17:47 IST)

कल्याण रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेतून पडताना वाचवले, पहा Viral Video

kalyan
Viral Video: मुंबईतील कल्याण स्थानकात चालत्या ट्रेनमधून खाली उतरताना एका व्यक्ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये अडकला गेला. त्याचवेळी एका पॉइंटमॅनची नजर त्याच्यावर पडते आणि तो त्याला वाचवण्यासाठी धावत जातो. यामुळे आता त्या पॉइंटमॅनचे कौतुक केले जात आहे.
 
सेंट्रल रेल्वने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये एक कॅप्शन देत असे म्हटले की, कल्याण स्थानकात पॉइंटमॅनने एका प्रवाशी नागरिकाचा जीव वाचवला आहे. ही घटना 14 नोव्हेंबरची आहे. पॉइंटमॅन श्री शिवाजी सिंह यांनी एका प्रवाशाला प्लॅटफॉर्मवर आणि ट्रेनच्या मध्ये पडल्याचे पाहिले. त्यावेळी तातडीने त्याचा जीव वाचवला.