1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (17:13 IST)

हिवाळ्यात मुळा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित होईल, जाणून घ्या मुळा खाण्याचे ५ फायदे

radish in winter
हिवाळ्यात रंगीबेरंगी भाज्या बाजारात येतात. लाल रंगाची गाजर, पांढरी कोबी, पांढरा मुळा, हिरव्या भाज्यांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. अशाप्रकारे, निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात सर्व भाज्यांचा समावेश करा. मुळा ही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर भाजी आहे. रक्तदाबाच्या रुग्णांनी आपल्या आहारात मुळ्याचा समावेश करावा. मुळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि रक्तवाहिन्यांना फायदा होतो. मुळा तुम्ही सॅलड किंवा भाजी म्हणून खाऊ शकता. याशिवाय चवीसाठी मुळ्याचे पराठेही खाऊ शकता. जाणून घ्या मुळा खाण्याचे शरीराला कोणते 5 फायदे होतात.
 
मुळा खाण्याचे फायदे
रक्तदाब नियंत्रणात ठेवाण्यास मदत होते- रक्तदाबाच्या रुग्णाने आहारात मुळ्याचा समावेश करावा. मुळ्यात पोटॅशियम असते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. उच्च रक्तदाबाच्या रुग्णाने मुळा जरूर खावा.
 
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत होते – मुळा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते, ज्यामुळे खोकला आणि सर्दीची समस्या तुम्हाला त्रास देत नाही. मुळा खाल्ल्याने सूज आणि जळजळ होण्याची समस्याही कमी होते.
 
हृदय निरोगी ठेवते- मुळा खाल्ल्याने हृदय व्यवस्थित काम करू लागते. मुळा मध्ये अँथोसायनिन्स असतात जे हृदयासाठी चांगले असतात. रोज मुळा खाल्ल्याने 
 
हृदयविकाराचा धोका कमी होतो- मुळा मध्ये फॉलिक ऍसिड आणि फ्लेव्होनॉइड्स देखील चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो.
 
रक्तवाहिन्या मजबूत होतात- मुळ्यात कोलेजेन मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे रक्तवाहिन्या मजबूत होण्यास मदत होते. मुळा एथेरोस्क्लेरोसिस सारख्या गंभीर आजारांचा धोका कमी करते.
 
मेटाबॉलिज्म- मुळा खाल्ल्याने पोट निरोगी राहते. याच्या सेवनाने पचनक्रिया मजबूत होते. आम्लपित्त, लठ्ठपणा, जठरासंबंधी समस्या आणि मळमळ यासारख्या समस्या मुळ्याच्या सेवनाने दूर होतात.