गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (13:52 IST)

नात्याला काळिमा : बापानेच रागाचा भरात येऊन सावत्र मुलाचा खून केला,आरोपी बापाला अटक

Relationship stigmatized: Father killed his step-son out of anger
बारामती तालुक्यातील पारवडी येथे नात्याला काळिमा लावणारी धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका सावत्र बापानेच आपल्या मुलाचा कोयत्याने वार करून खून केला आहे. मारुती साधुराम जाधव असे या आरोपीचे नाव आहे. तर गोपीनाथ मारुती जाधव असे या मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. 

ही घटना घडली आहे पारवडी गावाची येथे आरोपी मारुती साधुराम जाधव मजुरीचे काम करायचा. त्याचे आपल्या सावत्र मुला गोपीनाथ सह काही घरगुती कारणावरून भांडण झाले. रागाचा भरात येऊन त्याने आपल्या मुलाच्या डोक्यावर कोयत्याने वार करून खून केला आणि पसार झाला. यथील वस्तीत राहणाऱ्याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीला शोधण्यास मोहीम सुरु केली. त्याला शोधणे अवघड होते. त्याचे कारण म्हणजे असे की  आरोपी कडे मोबाईल नव्हता.आणि त्याला कोणतेही नाते वाईक नसल्याने त्याचा फोटो देखील नव्हता. गुन्हेशोध पथकाने पोलीस निरीक्षक ढवाण यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या क्षेत्रात शोध मोहीम राबवून 3 तासानंतर वनविभागातील झाडीत लपून बसलेल्या सदर आरोपीला अटक करण्यात यश मिळाले.