बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 5 नोव्हेंबर 2020 (09:02 IST)

कशेळी गावातील मैदानात दोन ऐतिहासिक तोफा सापडल्या

मुंबईलगत असलेल्या भिवंडी ठाणे मार्गावर असलेल्या कशेळी गावातील मैदानात दोन ऐतिहासिक तोफा सापडल्या आहेत. भिवंडी तालुक्यातील शिव प्रेमी व इतिहास अभ्यासक जयकांत शिक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शिवज्योत संघटनेचे अध्यक्ष रोशन प्रकाश पाटील, पप्पू पाटील, शुभंकर पाटील, उदय पाटील हे तरुण एकत्र येत त्यांनी शिवज्योत परिवार महाराष्ट्र राज्य हि संघटना स्थापन केली आहे. या संघटनेचे ८० हून अधिक सभासद आहेत. शिव कालीन गड किल्यांच्या इतिहास तरुणांसह नागरिकांना माहित व्हावा तसेच ऐतिहासिक गड किल्ल्यांची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी हि संघटना काम करते.
 
भिवंडीतील कशेळी येथील मैदानाच्या मोकळ्या जागेत ऐतिहासिक तोफा असल्याची माहिती इतिहास अभ्यासक जयकांत शिक्रे यांच्या अभ्यासात तसेच रोशन पाटील यांना चर्चेतून माहिती मिळाली होती. शिवज्योतच्या सभासदांनी मागील पंधरा दिवसांपासून कशेळी येथे ऐतिहासिक वस्तूंचा शोध घेण्यास सुरुवात केली असता रविवारी कशेळी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे असलेल्या दत्त मंदिर आणि स्मशान भूमीच्या बाजूला सुरुवातीला एक तोफा आढळली. शिवज्योतच्या सभासदांनी अगोदर स्वतःच्या हातांनी आणि श्रमदानाने ही तोफ बाहेर काढण्यासाठी सकाळी आठ वाजल्या पासून सुरुवात केली होती.