गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 7 ऑक्टोबर 2024 (13:40 IST)

उद्योगपती रतन टाटा रुग्णालयात दाखल! अफवा असल्याचे रतन टाटा म्हणाले

ratan tata
उद्योगपती रतन टाटा यांची प्रकृती खालावली असून त्यांना रविवारी रात्री उशीरा गंभीर अवस्थेत ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशी बातमी सर्वत्र पसरली आहे. या वर ही बातमी अफवा असल्याची माहिती खुद्द उद्योगपती रतन टाटा यांनी दिली आहे.ते नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले असल्याचे म्हणाले. 

उद्योगपती रतन टाटा यांना रक्तदाब कमी झाल्यामुळे रविवारी रात्री उशिरा ब्रीच कॅण्डी रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांना आयसीयू  मध्ये दाखल केले आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर सतत लक्ष ठेवत  असल्याचे काही मीडिया माध्यमातून समोर आले. 

मात्र या बातमीचे खंडन करत खुद्द रतन टाटा यांनी ही बातमी अफवा असल्याचे स्वतः सांगितले. चुकीची माहिती पसरवू नये असे आवाहन त्यांनी जनतेला आणि प्रसार माध्यमांना केले आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. 
 
 
रतन टाटा यांनी त्यांच्या तब्येतीबाबतच्या अहवालांवर स्पष्टीकरण जारी करताना म्हटले आहे की, "माझ्या आरोग्याबाबतच्या अलीकडील अफवांची मला जाणीव आहे आणि हे दावे निराधार आहेत याची मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो... चिंतेचे कारण नाही."
Edited by - Priya Dixit