रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 जून 2024 (21:25 IST)

नागपुरात एका कार्यक्रमात नितीन गडकरींनी रतन टाटांचे उदाहरण दिले

nitin gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.ते म्हणाले, की जास्त सम्पत्ती असणाऱ्या नेत्यांचे पीए आणि पीएस जास्त दिमाखात असतात. चहा पेक्षा केतली जास्त गरम असते. ज्यांच्या कडे 10-20 कोटी रुपये येतात त्यांच्यात अहंकार येतो. ते गाणं म्हणू लागतात. साला मै तो साहेब बन गया संपत्ती आल्यावर लोकांमध्ये अहंकार येतो. आत्मविश्वास आणि अहंकारात अंतर आहे. अहंकार कामाचे नाही. शालीनता, नम्रता, सहजता, साधेपणा या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रशासन चालवणाऱ्यांसाठी हे सर्व महत्त्वाचे आहे.
 
ते म्हणाले की, ज्ञान, तंत्रज्ञान, शक्ती, मालमत्ता, व्यक्तिमत्व, व्यवसाय, नफा यांचा अभिमान बाळगू नका. ईडीवाले आल्यावर अभिमान उतरतो. हे वक्तव्य नागपुरात एका कार्यक्रमात दिले आहे. त्यांनी या वेळी रतन टाटांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, एकदा रतन टाटा त्यांच्या घरी भेटायला आले असता घराचा पत्ता विसरले आणि त्यांनी नितीन गडकरींना फोन करून त्यांच्या घराचा पत्ता विचारला.तेव्हा गडकरी म्हणाले आपण आपल्या वाहन चालकाला फोन द्या मी त्यांना सांगतो. या वर टाटा म्हणाले, मी स्वतः गाडी चालवत आहे. मी त्यांना म्हटले आपण एवढे मोठे आहेत आपल्याकडे वाहनचालक नाही. ते म्हणाले, नाही मी स्वतः गाडी चालवतो. 
 
नितीन गडकरी म्हणाले, मी स्वतः एकदा नागपुरात आलो होतो. माझ्या हातात एक पिशवी होती. त्यावेळी मी राज्यात मंत्री होतो. मी माझ्या असिस्टंटला रतनजींची बॅग हातात घेण्यास सांगितले. हे ऐकून रतन टाटा लगेच म्हणाले की नितीन नाही, बॅग माझी आहे, मी उचलतो.एवढी प्रचंड संपत्ती मिळाल्यावर किती सभ्यता, किती सहजता, किती नम्रता आहे. 
  
Edited by - Priya Dixit