1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 27 जून 2024 (10:09 IST)

भाजप वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची प्रकृती बिघडली

भारतीय जनता पार्टी (भाजपा) वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना बुधवारी दिल्ली मधील रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. तसेच त्यांना चिकिस्तकांच्या नजरेखाली ठेवण्यात आले आहे. तसेच सांगितले जाते आहे की, यूरोलॉजी विभागाचे चिकित्सक त्यांच्यावर उपचार करीत आहे.
 
अजून त्यांच्या आजाराबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती मिळाली नाही.  भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी या वेळी 96 साल वर्षांचे आहे. तसेच यावर्षी त्यांना देशाचे वरिष्ठ नागरिक म्हणून सम्मान देत भारत रत्नने  सम्मानित करण्यात आले आहे.
 
भाजपचे लोहपुरुष
भाजपचे प्रसिद्ध आणि महत्वाचे नेते राहिलेले आडवाणीयांनी  जनसंघपासून भाजपाला मजबूत बनवण्यासाठी पूर्ण जीवन कार्य केले. भाजपमध्ये असलेले नेते यांच्या संपूर्ण टीम ला अडवाणी यांनीच तयार केले आहे, अडवाणी यांनी त्यांच्या जीवनात अनेक यात्रा केल्या.