मंगळवार, 18 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 1 मार्च 2021 (21:41 IST)

मुजोर बेजबाबदार नागरिकांकडून पोलीसांना शिवीगाळ, दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांना काही बेजबाबदार नागरिकांकडून निष्काळजीपणा सुरू असल्याने पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईस काही मुजोर बेजबाबदार नागरिक विरोध करतात त्यातूनच अनेकदा वाद घडताना दिसतात .उल्हासनगरमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेत या मुजोर तरुणाने चक्क पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावत जाऊन त्याला शिव्या दिल्या.  उल्हासनगर श्रीराम चौक येथे पोलिसांची कारवाई सुरू होती. या कारवाई दरम्यान विना मास्क दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी अडवलं. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू असताना या दोन मुजोर तरुणांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून जात अश्लील भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात या दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.