शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated :मुंबई , सोमवार, 1 मार्च 2021 (15:24 IST)

शरद पवार यांनी कोरोनाची लस टोचून घेतली

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी कोरोनाची लस टोचून घेतली. काहीवेळापूर्वीच ते मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल झाले होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील रुग्णालयात आल्या आहेत.  याशिवाय, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहानेही यावेळी उपस्थित होते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस टोचण्यात आली. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस घेतली होती. 
 
 
शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत. देशात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. या टप्प्यात 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसंच गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या 45 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना करोना लस दिली जातेय. भारतात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड या लसी देण्यात येत आहेत.