गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (16:06 IST)

शरद पवार क्वारंटाईन होणार का?

कोरोना संकटाच्या पार्शवभूमीवर 'माझे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करत आहे', अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट द्वारे दिली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. शरद पवार यानी ट्विट केले आहे, की "कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व  नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत."
 
शरद पवार क्वारंटाईन होणार का?
दरम्यान, रविवारी नाशिक येथे राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या लग्न सोहळ्यानिमित्त पालकमंत्री छगन भुजबळ हे  शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजितपवार यांच्या सोबत उपस्थित होते. मात्र, छगन भुजबळ यांनी सोमवारी सकाळीच आपली कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विट द्वारे दिली होती. त्यामुळे आता शरद पवार व अजित पवार क्वारंटाईन होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांच्या सोबत भुजबळांनी आमदार सरोज आहेर यांच्या लग्नातही हजेरी लावली होती. रविवारी साहित्य संमेलनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह देखील भुजबळांची बैठक पार पडली होती. तसेच रविवारी छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांची आढावा बैठक देखील पार पडली होती. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाच्या धोक्याची शक्यता आहे.