राज्यात रविवारी ६९७१ कोरोना रुग्णांची भर

Last Modified सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (07:30 IST)
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना संकटावर नियंत्रण मिळवले होते परंतु नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे राज्यात कोरोना पुन्हा फोफावला आहे. यामुळेच राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा उद्रेक झाल्याचे दिसत आहे. राज्यात रविवारी ६९७१ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर ३५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर २४१७ कोरोनाबाधित रुग्णांची कोरोनाशी झुंज यशस्वी पार पाडून घरी परतले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण कोरोना रुग्णांचा आकडा २१,००,८८४ वर पोहोचला आहे. तर एकूण ५१७८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्या आतापर्यंत १९,९४,९४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात एकूण ५२,९५६ कोरोना रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशीही माहिती आरोग्या विभागाने दिली आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात निर्बंध लादले आहेत. पुण्यातही कोरोना रुग्णांच्या आकड्यामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे पुण्यात रात्री ११नंतर बाहेर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभ्यासिका वर्ग ५० टक्के क्षमतेने चालविण्यात यावेत. त्याचप्रमाणे रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
राज्यातील तीन जिल्ह्यामध्ये कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात निर्बंध लावले जात आहेत. अमरावती जिल्ह्यात राज्य सरकारने सात दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तर नागपूरमध्येही कडक निर्बंध लवकरचं घोषित होणार आहेत.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

लूट लिया रे... गाडीत पेट्रोल टाकवल्यानंतर अंगावर कपडेही ...

लूट लिया रे... गाडीत पेट्रोल टाकवल्यानंतर अंगावर कपडेही नव्हते
सध्या देशात पेट्रोलचे भाव गगनाला भिडले असून अनेक शहरांमध्ये पेट्रोल दराने शंभरी ओलांडली ...

यो-यो टेस्ट पास होण्याचे वरूणपुढे आव्हान

यो-यो टेस्ट पास होण्याचे वरूणपुढे आव्हान
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 12 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी ...

लस घेताना मास्क न घातल्यामुळे पीएम मोदींवर टीका

लस घेताना मास्क न घातल्यामुळे पीएम मोदींवर टीका
आजपासून देशामध्ये करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झालाय. आणि त्यातून अचानक घडलेली बाब ...

मोदी सरकार आजपासून स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी ...

मोदी सरकार आजपासून स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी देत​​आहे, कोठून खरेदी करायची ते जाणून घ्या
सॉवरेन गोल्ड बाँड योजनेची (एसजीबी) 12 वी मालिका सोमवारपासून सुरू झाली आहे. या मालिकेतील ...

6000mAh बॅटरीसह Gionee Max Proची लाँचिंग आज,10 हजारांनी ...

6000mAh बॅटरीसह Gionee Max Proची लाँचिंग आज,10 हजारांनी स्वस्त होईल फोन
चीनची फोन बनवणारी कंपनी जिओनी आज नवीन बजेट स्मार्टफोन Gionee Max Pro भारतात लाँच करणार ...