शनिवार, 6 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (11:42 IST)

छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण, शरद पवारांसोबत होत लग्न समारंभात

Chhagan Bhujbal Tests Corona positive
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. छगन भुजबळ यांनी स्वत: ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. 
 
भुजबळ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रविवारी छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांची आढावा बैठक तसेच साहित्य संमेलनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह देखील बैठक पार पडली होती. तसंच शरद पवार आणि अजित पवार यांच्या सोबत भुजबळांनी आमदार सरोज आहेर यांच्या लग्नातही हजेरी लावली होती. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाच्या धोक्याची शक्यता आहे.
 
भुजबळ यांनी ट्वीट केले की 'माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.मास्क,सॅनिटायझर चा नियमित वापर करा.'