1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (12:12 IST)

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेद्वारे केले लोकशिक्षण- अजित पवार

Acharya Balshastri Jambhekar did public education through journalism - Ajit Pawar
मराठी पत्रकारितेचे जनक, आद्यपत्रकार, ‘दर्पण’कार आचार्य बाळशात्री जांभेकर यांनी 'दर्पण' वृत्तपत्राची सुरुवात करून मराठी पत्रकारितेचा पाय रचला. मराठी पत्रकारितेला निर्भिड, नि:ष्पक्ष, लोकाभिमुखतेचा वारसा दिला. लोकशिक्षण, ज्ञानप्रसाराच्या उद्देशाने पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान प्रेरणादायी, मार्गदर्शक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्पणकार आचार्य बाळशात्री जांभेकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. 
 
आचार्य बाळशात्री जांभेकर यांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आचार्य जांभेकरांनी 'दर्पण' वृत्तपत्रातून समाज घडविण्याचे कार्य केले. तत्कालिन ब्रिटिश सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध केला. वृत्तपत्र हे समाजप्रबोधनाचे, राष्ट्र घडविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी दाखवून दिले. पत्रकारितेच्या क्षेत्रातीलत त्यांचे योगदान व कार्य मार्गदर्शक आहे. त्यांनी दिलेली शिकवण अंगीकारणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.