नवाब मलिक यांना जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यांना आता मुंबईतील बॅलार्ड स्टेट येथील ईडी कार्यालयात परत आणले. ते 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. दाऊद इब्राहिम आणि मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित लोकांकडून जमीन खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात आठ दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवले.
ईडीच्या कोठडीत चौकशीदरम्यान प्रकृती खालावल्याने त्यांना 25 फेब्रुवारीला मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय.