शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (15:58 IST)

किशोरी पेडणेकर यांनी स्वतःच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमावर घातली बंदी

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वतःच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. यापुढे कुठल्याच सार्वजनिक कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय महापौर पेडणेकर यांनी घेतला. कोरोनाचं नव्याने वाढलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, सोशल डिस्टन्सिंगसाठी महापौरांनी हे पाऊल उचललं. इतकंच नाही तर 1 मार्चपासून नगरसेवकांना लस देण्यात येईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. 
 
मागील काही दिवस महापौर पेडणेकर या रस्त्यावर उतरुन मास्क न लावणाऱ्या मुंबईकरांना झापत होत्या. फेरीवाले, विक्रेते यासह सर्वसामान्य नागरिकांनाही त्यांनी मास्क लावण्यास बजावलं होतं. आता मुंबई महापालिकेचे मार्शल्स लोकल रेल्वेतही फिरत आहेत. मास्क न लावणाऱ्यांना दंड ठोठावला जात आहे. याबाबत महापौर म्हणाल्या, “रेल्वेत फिरणाऱ्या मार्शल यांना मुंबई महापालिकेकडून पास दिला जाणार आहे. लग्न आणि समारंभावर लक्ष केंद्रित करणार आहे. आता लक्षणविरहित पॉझिटिव्ह रुग्णाला शिक्के मारले जातील”
 
जे आमचे महापालिकेचे शिक्षक आतापर्यंत घरी होते त्यांना आता आम्ही बोलावणार आहोत. त्यांना आम्ही 24 केंद्रांवर काम देणार. खेळाच्या मैदानावर पण खूप गर्दी होते. मास्क घालून लोकांना खेळता येईल. बगीच्यात बसता येईल. पुन्हा एकदा आम्ही जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या करणार आहोत. आरोग्य कॅम्प आणि फिरत्या मोबाईल व्हॅन यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्ण तपासणार आहोत, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.