बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 7 डिसेंबर 2020 (08:12 IST)

विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा मोर्चा विधानभवनावर धडकणार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक मराठा समाजाने 8 डिसेंबर रोजी घोषित केलेल्या मोर्चाची तारीख बदलली आहे. आता विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे. याप्रमाणे आता राज्यभरातून मराठा क्रांती मोर्चासाठी आंदोलक 14 डिसेंबरला मुंबईत दाखल होणार आहे. यावेळी राज्य सरकारकडे तातडीने मराठा आरक्षणावर मार्ग काढण्याची मागणी केली जाणार आहे .
 
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील या मराठा वाहन मोर्चासाठी राज्यभरातून हजारो वाहनं मुंबईत दाखल होणार आहे. हा विराट वाहन मोर्चा थेट विधीमंडळावर धडकेल. आधी हा मोर्चा 8 डिसेंबर रोजी निघणार होता. मात्र, मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आक्रमक शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदची घोषणा केल्याने मराठा मोर्चा पुढे ढकलण्यात आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.