नवी मुंबईतील तुर्भे डंपिंग ग्राउंडला भीषण आग
नवी मुंबईतील तुर्भे हनुमान नगरच्या मागे असलेल्या डंपिंग ग्राउंडमध्ये मंगळवारी भीषण आग लागली आणि त्यामुळे आकाशात धुराचे लोट पसरले.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्यात आले.आगीच्या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या परिसरातील झोपड्पट्टीपर्यंत आग पसरू नये या साठी अग्निशमन दलाचे बम्ब प्रयत्नशील आहे.
घटनेची माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे बम्ब वेळीच दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.
Edited By - Priya Dixit