महाराष्ट्राची कोणतीही योजना बंद होणार नाही, मंत्री उदय सामंत यांनी केला दावा
महायुतीत सर्व काही ठीक नसल्याचा दावा केला जात आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले नाही म्हणून ते रागावले आहे तर भाजप कडून वारंवार त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या सुरु झालेल्या अनेक योजना बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला असल्याच्या बातम्या येत आहे. परंतु महायुतीतील मतभेदांच्या बातम्यांना मंत्री उदय सामंत यांनी फेटाळून लावले आहे. ते म्हणाले, महायुतीने सुरू केलेली कोणतीही योजना बंद केली जाणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या काळात सुरु झालेली मुख्यमंत्री तीर्थ योजना बंद करण्याची तयारी सुरु केली आहे. या वर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी हे सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे.
सामंत यांनी सोमवारी सांगितले की, रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारीच मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेची अयोध्या संबंधित फाईल मला पाठवली असून मी ती मंजूर केली आहे.
तसेच सामंत यांनी महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बाबत देखील मोठे विधान केले आहे. या योजनेबाबत देखील अशाच अफवा पसरवल्या जात आहे. तर लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर लगेचच आचार संहिता लागू करण्यात आली त्यामुळे अर्जाची छाननी होऊ शकली नाही.
या योजनेत घालून दिलेल्या अटींनुसार, ज्या बहिणींकडे चारचाकी वाहन आहे, स्वतःचे घर आहे, उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. परंतु ही योजना सामान्य कुटुंबातील पात्र बहिणींसाठी सुरूच राहील.
Edited By - Priya Dixit