मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 10 फेब्रुवारी 2025 (20:29 IST)

माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलाचे अपहरण, पुणे पोलिस शोधात गुंतली

tanaji sawant
शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचे पुत्र आणि महाराष्ट्र सरकारमधील माजी आरोग्य मंत्री ऋतुराज तानाजी सावंत यांचे आज अपहरण करण्यात आले. सोमवारी म्हणजेच आज, 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता कारमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी तानाजी सावंत यांचा मुलगा ऋतुराज याला पळवून नेल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेने खळबळ उडाली आहे. 
ही बाब कळताच पुण्यातील सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुराजचे स्विफ्ट कारमधून सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नऱ्हे परिसरातून अपहरण करण्यात आले.
सिंहगड रोड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि पोलिसांनी सीसीटीव्ही तपास सुरु केला आहे. 
तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण कुणी आणि कशासाठी केलं याचा तपास पोलिस करत आहे. 
तानाजी सावंत यांच्या कात्रज परिसरातील निवासस्थानी पोलिसांचे एक पथक पोहोचले आहे. या ठिकाणी कोणाचे फोन आले होते का किंवा खंडणी मागण्यात आली होती का पोलिस याचा शोध घेत आहे. 
Edited By - Priya Dixit