बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 7 जानेवारी 2025 (11:03 IST)

अंधेरीत एका बहुमजली इमारतीला भीषण आग, वृद्धाचा मृत्यू तर एक जखमी

fire
Mumbai Andheri News : मुंबईतील अंधेरी परिसरातील एका बहुमजली निवासी इमारतीला लागलेल्या आगीत एका ज्येष्ठ नागरिकाचा गुदमरून मृत्यू झाला असून अन्य एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील अंधेरी भागातील एका बहुमजली निवासी इमारतीला लागलेल्या आगीत एका ज्येष्ठ नागरिकाचा गुदमरून मृत्यू झाला असून अन्य एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारी रात्री 10 वाजता 'ओबेरॉय कॉम्प्लेक्स'मध्ये असलेल्या 13 मजली 'स्काय पॅन' इमारतीच्या 11व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागली होती सुमारे चार तासांनी आग नियंत्रणात आली. आग लागल्यानंतर धुरामुळे दोघांचा श्वास गुदमरल्याने त्यांना जवळच्या कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आले. यातील एका वृद्धाला मृत घोषित करण्यात आले. तर एका व्यक्तीवर उपचार सुरु आहे. प्रथमदर्शनी अग्निशमन विभागाचा संशय आहे की आग शॉर्ट सर्किटमुळे लागली परंतु आगीचे खरे कारण तपासले जात आहे.