शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 13 सप्टेंबर 2020 (08:58 IST)

मातोश्री उडवून देण्याची धमकी देणारा अखेर जेरबंद

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे भासवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणारा अखेर जेरबंद झाला आहे. मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कोलकात्यातून एकाला अटक केली. 
 
दोन ते सहा सप्टेंबर या कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकीचे फोन केल्याचा आरोप आहे. 49 वर्षीय आरोपी हा कोलकात्यातील टोलीगंज भागात राहणारा जिम प्रशिक्षक आहे.
 
आरोपी पलाश बोसला कोलकातामधून अटक केली असली, तरी तो काही वर्षांपूर्वही दुबईला होता. दुबईत याचे काही धागेदोरे सापडतात का? याचा तपास करत एटीएस करत आहे.  तो कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित नाही. मानसिकदृष्ट्या व्यवस्थित आहे, असेही एटीएसने सांगितले.