शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2025 (14:27 IST)

मीरा-भाईंदर :लग्नाच्या वादातून प्रेयसीची हत्या, आरोपीला अटक

मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिस (एमबीव्हीव्ही) आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 3 ने उत्तर प्रदेशातील एका महिलेच्या दोन महिन्यांपूर्वीच्या खून प्रकरणाचा 24 तासांत यशस्वीपणे उलगडा केला. अमित सिंग याला प्रेयसीच्या हत्ये प्रकरणी अटक केली आहे. प्रिया सिंग असे या मयत महिलेचे नाव आहे. 
27 डिसेंबर 2024 रोजी प्रिया सिंग तिच्या मूळ गावातून गोरखपूर उत्तर प्रदेशातून बेपत्ता झाली. 
चौकशीत असे दिसून आले की प्रिया सिंग अनेकदा वसई पश्चिमेला राहणाऱ्या अमित सिंगला भेटायची. ती त्याला शेवटची 16 डिसेंबर रोजी भेटायला आली होती. अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अमित सिंगला चौकशीसाठी बोलावले.
सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या अमित सिंगने अखेर २५ डिसेंबर रोजी प्रिया सिंगची हत्या केल्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या कबुलीनुसार, अमित सिंग आणि प्रिया सिंग रिलेशनशिपमध्ये होते, परंतु तिच्या कुटुंबाचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. प्रियाने लग्न करण्यासाठी दबाव आणल्याने, अमित सिंगने तिला ड्राईव्हवर जाण्याच्या बहाण्याने महाजन पाडा येथील पोमन येथील रॉयल पार्क इंडस्ट्रीजवळील एका निर्जन भागात नेले. रात्री 11:00 वाजताच्या सुमारास त्याने तिचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह जवळच्या नाल्यात फेकून दिला.
तपासकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी, अमित सिंगने तिचा सक्रिय मोबाईल फोन राजधानी एक्सप्रेस ट्रेनमध्ये ठेवला. आरोपीवर नायगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खून आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे . तो आता कोठडीत आहे आणि तपास नायगाव पोलिस करत आहे. 
 
Edited By - Priya Dixit