रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2023 (11:51 IST)

Mumbai Airport मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, 1 मिलियन डॉलर्सची केली मागणी

Airport
Mumbai Airport Bomb Threat मुंबईच्या टर्मिनल 2 आंतरराष्ट्रीय विमानतळाला गुरुवारी बॉम्बची धमकी मिळाली. धमकी देणाऱ्या आरोपीने बॉम्बस्फोट न करण्याच्या बदल्यात 48 तासांच्या आत बिटकॉइनमध्ये $1 मिलियनची मागणी केली. ही धमकी ई-मेलद्वारे पाठवण्यात आली होती.
 
पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला
या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी तातडीने दखल घेतली. मुंबईच्या सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 385 आणि 505 (1) (बी) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. आयपी अॅड्रेस ट्रेस करण्यात आला असून आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.