रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 (08:18 IST)

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन

मुंबई, :- महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शनिवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचे  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सपत्नीक आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
 
यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर आदी मान्यवरांनीही श्री. बैस यांचे स्वागत केले.
Edited by : Ratnadeep Ranshoor