शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 3 ऑगस्ट 2022 (15:18 IST)

मुंबईच्या ‘बेस्ट बस' ने घेतले 'हे' दोन महत्वाचे निर्णय

st buses
मुंबईची लाईफलाईनअशी ओळख असलेली मुंबईची ‘बेस्ट बस' ने दोन महत्वाचे  निर्णय घेतले आहेत. यात एका रुपयात सात दिवसांचा बस पास आणि डबल देकार ई – बस सेवा देणायचे निर्णय बेस्ट तर्फे घेण्यात आले आहेत.
 
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने बेस्टने दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत, त्यातील एक म्हणजे बेस्टने फक्त एका रुपयात बेस्ट आझादी योजनेची घोषणा केली आहे. या उपक्रमाअंतर्गत चालो ऍपचा पहिल्यांदा वापर करणाऱ्या नव्या प्रवाशांना सात दिवसांचा म्हणजेच एका आठवड्याचा बस पास हा केवळ एका रुपयात डाऊनलोड करता येणार आहे. यामध्ये प्रवाशांना वातानुकुलीत किंवा विना वातानुकूलित बस मध्ये सात दिवसांमध्ये कितीही अंतराच्या पाच फेऱ्यांचा लाभ घेता येणार आहे.
 
१५ ऑगस्ट २०२२ पर्यंत म्हणजेच स्वातंत्र्य दिनापर्यंत या सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. सद्य स्थितीत ३३ लाख प्रवाशी रोज बेस्टने प्रवास करतात त्यापैकी २२ लाख प्रवासी चालो ऍपचा वापर करतात, तर ३. ५ लाख प्रवासी डिजटल तिकीट प्रणालीचा वापर करतात.
 
मुंबईकरांना प्रवासाचा सुखद अनुभव देण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात ९०० डबल डेकर बस घेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने काही दिवसांपूर्वीच घेतला. बेस्टच्या डबल डेकर बस या जास्त प्रवासी वाहतुक क्षमतेच्या आहेत. आता इलेकट्रीक बसच्या पर्यायामुळे इंधनाची सुद्धा बचत होणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीच्या दृष्टीने अधिक प्रवासी क्षमतावाढ सुद्धा शक्य होणार आहे. वर्षा अखेर पर्यंत या डबल डेकर ई – बस मुंबईच्या रस्त्यांवर धावणे अपेक्षित आहे.