चोरी केल्याप्रकरणी दोन अभिनेत्रींना अटक

crime
Last Modified शुक्रवार, 18 जून 2021 (16:09 IST)
मुंबईतील गोरेगाव आरे कॉलनी परिसरात मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन अभिनेत्रींना अटक केली आहे. या दोन्ही अभिनेत्री ‘क्राईम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ यासारख्या गुन्हेविषयक मालिकांमध्ये काम करतात. या अभिनेत्रींची चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तब्बल तीन लाख रुपयांची चोरी केल्याप्रकरणी त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या दोन्ही आरोपी अभिनेत्रींनी प्रसिद्ध टेलिव्हिजन शो क्राईम पेट्रोल आणि काही अन्य शोमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. कोरोना काळात मालिकांचे शुटिंग बंद असल्याने पैशाची चणचण जाणवत असल्याने या दोघांनी चोरीचा मार्ग निवडला. या दोघांचा
एक मित्र गोरेगाव आरे कॉलनीमध्ये पेइंग गेस्ट चालवतो. आरे कॉलनीतील रॉयल पाम या उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात १८ मे रोजी त्या पेईंग गेस्ट म्हणून गेल्या. दरम्यान या पेइंग गेस्टमध्ये आधीपासून एक तरुणी राहत होती. त्या तरुणीचे तीन लाख रुपये या दोघींनी चोरी करुन पोबारा केला. तब्बल ३ लाख २८ हजार रुपये दोघांनी चोरले. परंतु पैसे चोरी करुन इमारतीतून बाहेर पडताना या दोघी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या. त्यानंतर संबंधित तरुणीच्या चोरीची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. या तपासात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

मुलांच्या लसीकरणाची तयारी ठेवा : मुख्यमंत्री

मुलांच्या लसीकरणाची तयारी ठेवा : मुख्यमंत्री
कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा ...

औरंगाबाद : अल्पवयीन मुलानं क्राईम सीरीज पाहून केली ...

औरंगाबाद : अल्पवयीन मुलानं क्राईम सीरीज पाहून केली प्राध्यापकाची हत्या
औरंगाबाद : अल्पवयीन मुलानं क्राईम सीरीज पाहून केली प्राध्यापकाची हत्या

दिवाळी आधी कोरोना निर्बंध शिथिल होणार

दिवाळी आधी कोरोना निर्बंध शिथिल होणार
विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राइड्ससाठी ...

एकाच सापामुळे भाऊ बहिणीचा मृत्यू

एकाच सापामुळे भाऊ बहिणीचा मृत्यू
एका सापाने सख्या बहिण भावाचा मृत्यू झाला आहे. घरात लपलेल्या मण्यार जातीच्या सापाने आधी ...

ओडिशात जन्मले 2 डोके आणि 3 डोळ्यांचे वासरु

ओडिशात जन्मले 2 डोके आणि 3 डोळ्यांचे वासरु
ओडिशाच्या नबरंगपूरमध्ये ए