शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 जून 2021 (14:01 IST)

Monsoon मुंबई-ठाणे कोकणमध्ये 17 आणि 18 जूनला अतिवृष्टीचा इशारा

मान्सूनच्या मुसळधार पावसाला सामोरे जाणार्‍या मुंबईत सकाळपासूनच बर्‍याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. दि वेदरमनच्या अंदाजानुसार मुंबईत दिवसभर हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 17 आणि 18 जून रोजी मुंबईच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
 
दरम्यान, बुधवारी मुंबईच्या सायन परिसरात मुसळधार पावसामुळे रस्ते भरले. हिंदमाता चौकातील रस्त्यावरही पाण्याचा साठा दिसून आला. या दरम्यान वाहने निघण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला.
 
हवामान अंदाजानुसार ठाण्यात पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. या बरोबरच, पश्चिमेकडील वार्‍याने देखील जोर धरल्यामुळे उत्तर महाराष्ट्र किनार्‍यापासून उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हे घडले आहे.
 
आयएमडीचे वैज्ञानिक के एस होसाळीकर यांनी एका ट्वीटमध्ये माहिती दिली आहे की कुलाबा, सीएसएमटी, वरळी आणि मुंबईच्या लगतच्या किनारी भागात 2 ते 3 तासांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
 
राज्यात मान्सून सक्रीय झाला असला तरी कोकणमधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे वगळता अन्य भागात पावसाने पुन्हा दडी मारली आहे. अधूनमधून तुरळक पाऊस होत आहे. मात्र, अजून आठवडाभर पावसाची शक्यता नाही. दरम्यान, मुंबई-ठाणे कोकणमध्ये मुसळधार पावसाचा  इशारा देण्यात आला आहे. 17 आणि 18 जूनला मुसळधार पावसाचा शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. 
 
राज्यात अजूनही सर्वत्र मौसमी पावसाचे आगमन झालेले नाही, त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी करू नये, असे आवाहन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. येत्या 17 ते 18 तारखेला राज्यात जोरदार पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, जून अर्धा महिना संपला तरी अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.