बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (12:15 IST)

विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवासाची मुभा

अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून विद्यार्थ्यांना लोकलने प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. 
 
करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सर्वसामान्य लोकांसाठी सध्या बंद असून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल धावत आहेत. विद्यार्थी ओळखपत्र तसंच हॉल तिकीट दाखवत लोकलने प्रवास करु शकणार आहेत.
 
मध्य रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या तसंच स्पर्धात्मक परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विशेष उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.