सोमवार, 5 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (07:58 IST)

रेस्टोरंट, मंदिरे पुन्हा सुरु होण्याची शक्यता,मात्र लोकल सेवाचा निर्णय नाही

अनलॉकच्या 4 थ्या टप्प्यात रेस्टॉरंट आणि मंदिरे पुन्हा सुरू करावी अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यामूळे लवकरच ही मागणी पुर्ण करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे. येत्या ३- ४ दिवसांत याबाबतचा निर्णय होण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, असे असले तरी मुंबईकरांना लोकल रेल्वे पुन्हा रुळावर कधी येईल हे पाहण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. लोकल सेवा पुन्हा सुरु करण्याबाबत अजूनतरी काही सकारात्मक बाब समोर येत नाही आहे.
 
दरम्यान राज्यातील मंदिरांसाठी ई-दर्शनाच्या माध्यमातून मर्यादित संख्येने देवदर्शन करता येऊ शकेल, अशी पद्धत सुरु करण्याबाबत टास्क फोर्समध्ये चर्चा झाली आहे. ई-दर्शन किंवा मंदिरात जाण्याची वेळ बूक करता येऊ शकेल, त्यानुसार मंदिरातील गर्दी टाळता येईल.
 
तसेच, रेस्टॉरंटमध्ये पार्सलव्यक्तिरिक्त १० टक्के क्षमतेची बैठक व्यवस्था अर्थात सीटिंग अरेंजमेंटमध्ये रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत विचार आहे. तसेच, शाळा सुरु करण्यासंदर्भातही टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा झाली, मात्र अद्याप कोणताही निर्णय नाही. लोकलप्रमाणेच शाळा सुरु होण्यासही काही काळ वाट बघावी लागणार आहे.