बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 ऑगस्ट 2020 (16:14 IST)

शिर्डीचे साई मंदिरही खुले करावे अन्यथा न्यायालयात‌‌‌ जाऊ

माजीमंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र खासदार सुजय‌ विखे पाटील यांनी राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे. शिर्डीचे साई मंदिरही खुले करावे अन्यथा न्यायालयात‌‌‌ जाण्याचा‌ इशारा, सुजय विखे यांनी दिला आहे. 
 
“शिर्डीच‌ं सर्व अर्थकारण साई मंदिरावर अवलंबून आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार देशातील तिरुपती, वैष्णोदेवी मंदिर सुरु झाले. शिर्डी संस्थान आर्थिकदृष्ट्या‌ सक्षम आहे. ऑनलाईन दर्शन सुविधा असल्याने मंदिर सुरु करणे सोयिस्कर असून, गर्दी न होता ठराविक संख्येने भाविकांना दर्शन देणे शक्य आहे. सर्व ग्रामस्थांच्यावतीने मंदिर खुले करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. मात्र सप्टेंबरपर्यंत मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचं” सुतोवाच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलं.