शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 फेब्रुवारी 2020 (12:02 IST)

सलमान खान कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना घरे बांधून देणार

अभिनेता सलमान खान  कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गाव सलमान दत्तक घेणार असून पूरग्रस्तांना तो पक्की घरं बांधून देणार आहे. ऑगस्ट 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा कोल्हापूर जिल्ह्याला मोठा फटका बसला होता. बरीच गावं पाण्याखाली जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. तत्कालीन राज्य सरकारपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अनेक जणांनी मदतीचा हात पुढे केला होता. आता पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांची मोडकी घरं पुन्हा बांधून देण्यासाठी ‘भाईजान’ने उशिरा का असेना, धाव घेतली आहे.
 
सलमान खानची चित्रपट निर्मिती संस्था ‘सलमान खान फिल्म्स’ आणि गुरुग्राम येथील ‘ऐलान फाऊंडेशन’ या दोन संस्थांनी मिळून खिद्रापूर गाव दत्तक घेतल्याची माहिती आहे. पूरग्रस्तांचे संसार सावरण्यासाठी सलमान पक्की घरं बांधून देणार आहे.