बुधवार, 30 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020 (15:19 IST)

मुंबईतील ३ ठिकाणी, २ दिवस जैन मंदिर उघडण्याची परवानगी

जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वालाही सुरूवात झाली असून यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं मुंबईतील तीन ठिकाणी जैन मंदिर उघडण्याची परवानगी दिली आहे.
 
सर्वोच्च न्यायालयानं मुंबईतील तीन ठिकाणी मंदिर खुली करण्यास परवानगी दिली आहे. न्यायालयानं मुंबईतील दादर, भायखळा आणि चेंबूर येथील जैन मंदिरं प्रार्थनेसाठी खुली करण्यास परवानगी दिली आहे. पर्युषण पर्वाच्या अखेरचे दोन दिवस मंदिरं उघडण्यात येणार आहे. २२ व २३ ऑगस्टला मंदिरं खुली राहणार आहेत. मंदिरं खुली केल्यानंतर केंद्र सरकारनं करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या नियमांचं पालन करण्यात यावं, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
 
सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठानं हा निर्णय दिला. हा आदेश देताना न्यायालयानं म्हटलं आहे की,”ही सवलत इतर मंदिरं खुली करण्यासाठी वा मोठी गर्दी होणाऱ्या गणेश चतुर्थी उत्सवासाठी (गणेशोत्सवासाठी) देता येणार नाही,” असं स्पष्ट केल आहे.