बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 19 ऑगस्ट 2020 (15:50 IST)

हे तर मुंबई पोलिसां विरोधात षडयंत्र : संजय राऊत

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आहे. यावर बोलताना मुंबई पोलिसांनी योग्य तपास केला, मुंबई पोलिसां विरोधात हे षडयंत्र असल्याची प्रतिक्रीया खासदार संजय राऊत यांनी दिली.
 
मुंबई पोलिसांनी योग्य दिशेनेच प्रवास कला आहे. पण हे मुंबई पोलिसांविरोधात षडयंत्र रचण्यात आलं आहे. यामुळे राज्याची बदनामी झाली आहे. राज्याची अशी बदनामी करणं आयोग्य आहे. कायद्यापुढे कोणीही मोठं नाहीये, निकालपत्र हाती आल्याशिवाय बोलणार नाही. अशी प्रतिक्रीया खासदार संजय राऊत यांनी सुप्रिम कोर्टाच्या निर्णयावर बोलताना दिली.