मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (15:37 IST)

माझ्या मनात डॉक्टरांविषयी कायम आदर राहिला आहे : संजय राऊत

मनमोहन सिंहांवर होतात. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून एखादी कोटी झाली. त्यामाझ्याकडून डॉक्टरांचा कुठेही अपमान झालेला नाही. अपमान आणि कोटी यातला फरक समजून घेतला पाहिजे. अशा प्रकारच्या कोट्या राजकारण्यांवर होतात, सरदारांवर होतात. मोदींवर होतात,चं कौतुक व्हायला हवं. हा डॉक्टरांचा बहुमान आहे खरंतर. माझ्या मनात डॉक्टरांविषयी कायम आदर राहिला आहे. कंपाऊंडर हा प्रकार काही टाकाऊ नाही’, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. 
 
‘डॉक्टर आमचेच आहेत. डॉक्टरांवर जेव्हा काही संकटं आली आहेत, तेव्हा मी स्वत: त्यांच्या मदतीला गेलो आहे. कोरोनाच्या काळात शिवसेनेच्या अनेक लोकांनी हॉस्पिटलकडून दिल्या जाणाऱ्या लाखो बिलांच्या विरोधात आंदोलनं केली आहेत. त्यांना समजावण्यासाठी मी अनेकदा गेलो आहे. मी डॉक्टरांच्या बाजूने उभा राहिलो आहे. मार्डच्या डॉक्टरांनी माझ्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यांचा अधिकार आहे. पण मार्डच्या डॉक्टरांच्या अनेक भूमिका मी मांडल्या आहेत. डॉक्टर सध्या अत्यंत कठोर परिश्रम घेत आहेत. त्याचं कौतुक मी जाहीरपणे केलं आहे. सामनातूनही केलं आहे. तरी त्यांना का वाटतंय की माझ्याकडून त्यांचा अपमान झाला. आत्तापर्यंत मी कधीही डॉक्टरांचा अपमान केलेला नाही. यावरचं राजकारण थांबवायला हवं’, असं देखील राऊत यावेळी म्हणाले.