मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 12 ऑगस्ट 2020 (10:38 IST)

सुशांत प्रकरण: ४८ तासात जाहीर माफी मागा, संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ४८ तासात जाहीर माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला तयार राहा असं नोटीस पाठवण्यात आलं आहे.
 
या प्रकरणात संजय राऊत यांनी उडी घेत केलेल्या वक्तव्यावर सिंह कुटुंबियांनी आक्षेप घेतला होता. संजय राऊत यांनी सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केलं असून त्यामुळे सुशांत नाराज असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर सुशांतच्या चुलत भावाने संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 
 
संजय राऊत यांनी सामनाच्या लेखातून हा दावा केला होता की, सुशांत आपल्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे खूश नव्हता म्हणून त्याचे आपल्या वडिलांशी नातं फारसं चांगलं नव्हतं.