बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (09:24 IST)

कोकणात जाणाऱ्यांना कोविड- 19 ची चाचणी करणे अनिवार्य

शासनाच्या निर्देशानुसार 13 ते 21 ऑगस्ट दरम्यान कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटी बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. मात्र, प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशांनी कोविड - 19  ची चाचणी करणे अनिवार्य असून चाचणी निगेटिव्ह असल्यास प्रवास करता येईल, अशी अट ठेवण्यात आली आहे. 
 
कोकणात जाण्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकावर बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. परंतू यासाठी कोविड टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी प्रवाश्यांना अडीच हजार मोजावे लागणार आहेत.
 
कोविड -19 ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास आरक्षण रद्द करता येणार नाही. तसेच प्रवासासाठी स्वतंत्ररित्या ई-पासची आवश्यकता असणार नाही असे महामंडळाकडून कळविण्यात आले आहे. 
 
गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी 6 ऑगस्ट पासून एसटीने मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकावरून बसेस सुरु केल्या आहेत. यासाठी तब्बल 10 हजार प्रवाशांनी आगाऊ आरक्षण देखील केले आहे. सॅनिटाईझ केलेल्या बसेस आणि प्रवाशांसाठी मास्क लावणे आणि सामाजिक अंतर राखणे बंधनकारक असून प्रवास केला जात आहे.