शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (09:32 IST)

आता आवाजावरून कोरोना चाचणी, आदित्य ठाकरे यांनी दिली माहिती

मुंबई महानगरपालिका कोरोना टेस्टिंगसाठी आता एका नव्या पद्धतीचा वापर करणार आहे. केवळ आवाजाच्या सहाय्याने कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
 
बीएमसीद्वारे आता ध्वनी लहरींवरून करोनाची चाचणी केली जाणार आहे. या नव्या प्रयोगात ध्वनी लहरींवरुन कोरोना पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्ह असल्याचे निदान केले जाऊ शकते.
 
मुंबई महानगरपालिका AI तंत्रज्ञानानुसार फक्त आवाजाच्या माध्यमातून कोविड टेस्टचं परिक्षण करणार असल्याचं, पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. कोविडचे निदान करण्यासाठी गोरेगाव येथील नेस्को जंबो कोविड सेन्टंरमध्ये व्हॉईस सॅम्पलिंग पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. गोरेगावच्या नेस्को सेंन्टरमध्ये कोविड असणाऱ्या आणि संशयित असणाऱ्या १००० रूग्णांनावर सध्या एआय-आधारित व्हॉईस सॅम्पलिंगचा वा पर करून चाचणी करण्यात येणार आहे.
 
ध्वनी लहरींच्या या चाचणीमुळे केवळ ३० मिनिटांत करोनाची लागण झाली आहे की नाही याचे निदान स्पष्ट होणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे
 
शिवसेना नेता आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. 
 
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य प्रशासन व राज्य सरकारकडून अनेक खबरदारीचे उपाय राबवण्यात येत आहे. त्यासाठी नवनवीन योजना आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून AI-आधारित कोविड टेस्टिंगचे एक परीक्षण एक नवीन पाऊल उचलण्यात येत आहे.  यापूर्वी हा प्रयोग परदेशात करण्यात आला आहे आणि तो यशस्वी झाल्याचं समोर आलं आहे.